युवतीचा संशयास्पद मृत्यू ; शाळेच्या परिसरात आढळला मृतदेह

गडचिरोली: कोलकत्ता, बदलापूर कोल्हापूर घटनेत मुलीवर झालेल्या अत्याचाराचा राज्यभर संताप व्यक्त होत असताना आज गडचिरोली येथील कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने खळबळ माजली. ज्योती मेश्राम (वय 26) असे मृत्य युवतीचे नाव आहे.

 

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना युवतीचा मृतदेह भिंतीला लागून असल्याचा आढळून आलं. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व ठाणेदार महेंद्र वाघ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर युवतीचा मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. युवतीच्या शरीरावर मार लागल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत, शिवाय गळा ही आवळलेला नाही त्यामुळे प्राथमिक तपासात युवती चा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

🤙 9921334545