मुंबई :चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस आहे. त्यांच्या कामटी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष मागे आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो.
काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. हे बावनकुळे यांना ऐकू येत नसेल तर त्यांनी कानाचे ऑपरेशन करून घ्यावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
बदलापूर घटनेत पोलीस अधिकारी दखल घेत नव्हते. शाळा सत्ताधाऱ्यांशी संबधित होती. यात संस्था चालक जबाबदार आहे अस म्हणत नाही, मात्र संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर हे गंभीर आहे. पोलीस दखल घेत नाही, हे कठीण आहे. खाकी वर्दीमुळे यांना आपण पोलीस म्हणतो, राज्यात पोलिसांना घर गड्यासारखे वागवले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.