विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी उद्याचा बंद पाळा:उद्धव ठाकरे

मुंबई : उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे.हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहेत का याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे सर्वांना या बंदात सहभागी व्हा.

 

तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात अत्यावश्यक सेवा ह्या चालू राहतील उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बदलापूर प्रकरणातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत,नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही पण सुरक्षित बहीण महत्त्वाचे आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

🤙 9921334545