कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत
दरवर्षीप्रमाणे 2024 या ही वर्षी फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर, एडिटर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हातील फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, एडिटर्स यांचा भारतीय डाक विभागाची लाभदायी विमा योजना नोंदणी शिबिर राबवण्यात आले.

यामध्ये डाक विभागाकडून 555 मध्ये 10 लाखाचा अपघाती विमा व 755 मध्ये 15 लाखाचा विमा अपघाती विमा उतरविण्यात आला. हे शिबिर भालचंद्र चिकोडे ग्रंथालय जरगनगर याठिकाणी राबवण्यात आले. या शिबिराला संघटनेच्या सभासदांचा तसेच स्थानिक नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.तसेच भाजपाचे राहुल चिकोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष जकाते,उपाध्यक्ष प्रभात चौगुले,सेक्रेटरी विनायक कुचगावे,खजानीस युवराज राऊत,संचालक अभिषेक शिवदास, सायलस मनपाडलेकर, जगदीश गुरव,सुरेश मोरे,अमर जाधव तसेच सर्व सभासद उपस्थित होते..
