हसन मुश्रीफ यांच्या नावाचा वापर करून महिलेची वीस लाखाची फसवणूक

कोल्हापूर:पुण्यात एका सेवानिवृत्त शिक्षिकेची वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाचा वापर करून वीस लाखाची फसवणूक झाली आहे .याचा तपास झालाच पाहिजे अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, राजस्थानमधील उषा मुरलीधर व्यास नावाच्या सेवानिवृत्ती शिक्षिका आहेत त्यांना बनावट पोलीस निरीक्षक नरेंद्र गुप्ता या नावाने फोन करून हसन मुश्रीफ हे आमच्या ताब्यात आहे, असे सांगितले जाते. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या सेवानिवृत्त शिक्षिका आमच्या ओळखीच्या ही नाहीत. आपला संबंध नसताना लोक पैसे देतातच कसे अशा गुन्हेगारीचा निपात झाला पाहिजे.आपली बदनामी करण्याचा कट केला जातोय असं ही ते म्हंटले.

🤙 8080365706