कोल्हापूर: स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या बहिण भावांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.हे दोन्ही बहिण भाऊ उच्चशिक्षित होते.काही महिन्यापूर्वी आपल्या प्रिय आईच्या स्मरणार्थ वाईच्या प्राज्ञपाठ शाळेला तब्बल 25 लाख रुपयांची देणगी भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी यांनी दिली होती.

नाळे कॉलनीतील ‘वरदा’ बंगल्यात हे तिघे राहत होते.आईच्या निधनानंतर या बहिण भावांनी टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले. या दोघांच्या मातोश्री पद्मजा नीलकंठ कुलकर्णी यांची आपल्या जवळील धनाचा साठा गरजूंसाठी करावा अशी भूमिका होती.
