मुंबई :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’या योजनेसाठी एक कोटी दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे पैसे टाकले जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले .

ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे आहेत,आणि नव्याने जे अर्ज करत आहेत,अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
