केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार : उद्धव ठाकरे यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असून, हुकूमशाहचा पराभव करून संविधान व लोकशाही वाचविण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.

बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे होती. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ४ जूनला भाजपचा पराभव अटळ असल्याचे सूर सर्वच नेत्यांनी सांगितले. मुंबईतील ही निवडणूक प्रचाराची सभा इंडिया आघाडीच्या विजयाची नांदी ठरणारी आहे.

हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराज आहे, मोदी-शहा-अदानीचा होऊ देणार नाही. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. नाशिकच्या सभेत मोदी हिंदू-मुस्लीम भाषा करू लागले, त्यावेळी एक शेतकरी उभा राहून म्हणाला कांद्यावर बोला. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला मोदी उत्तर देऊ शकले नाहीत.

हुकूमशहाची नजर कशी राक्षसी असते त्याचा अनुभव लोकांनी घेतला. या हुकूमशहाचा विषाणू पासून देशाला वाचवायचे आहे. ४ जूनला मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांचे, लोकशाहीचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. सत्ताबदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले. नरेंद मोदींनी चारसो पारची घोषणा दिली आहे, परंतु भाजप दोनशे पारही करणार नाही, देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास खरगे यांनीही व्यक्त केला.

🤙 8080365706