मी कामाचा खासदार, नावाचा खासदार नाही : खास धैर्यशील माने

इस्लामपूर , प्रतिनिधी : मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. मी रोज आलो आणि कामच केले नाही. तर काय उपयोग. देशातील कोणाचीही जात,पात धर्म व पंत न बघता संपुर्ण भारत देश स्वःताचा परिवार समजून ऐशी कोटी जनतेला मोफत अन्न धान्य व कोरोनाची लस दिली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न आहे. तरी केंद्रात मोदींना साथ देण्यासाठी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटण दाबण्याचे आवाहन धैर्यशील माने यांनी पेठ (ता. वाळवा) येथील कार्यकर्ता बैठकीत केले.

खास . माने पुढे म्हणाले, मी कृतीतून व माझ्या कामातून विरोधकांना उत्तर दिले आहे. पेठ-सांगली रस्त्यासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. माजी खासदारांचे गेल्या दहा वर्षातील काम बघा व माझी या दोन वर्षातील कामे बघा.
दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे म्हणाले , संविधानाच्या व आरक्षणाच्या संदर्भात विरोधक अफवा पसरवत आहेत. संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही . त्यामुळे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. वाटेगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटी रुपये माणगाव परिषद झालेल्या माणगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी 200 कोटीच्या आराखड्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा मतदारसंघातील प्रत्येक गावातील दलीत मागासवर्गीय वस्तीसाठी सर्वात जास्त निधी सर्वच गावात खासदार माने यांनी दिलेला आहे त्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी खास. माने यांना विजयी करा.


सम्राट महाडीक यांनी देशहितासाठी व देशाचे नेतृत्व करणाऱ्या मोदींना साथ देण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून देण्याचे आवाहन केले.
बैठकीस राहुल महाडीक, सत्यजीत देशमुख, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, मोहनराव मदने, जगन्नाथ माळी, डॉ. सचिन पाटील, जयराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तम चांदणे, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, राहुल पाटील, असिफ जकाते, विशाल शेटे, बजरंग भोसले, निता भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.