विधानसभेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ?

सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकर युगेंद्र पवार असण्याची शक्यता असल्याचं म्हणताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची . पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच बारामतीत विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार  बारामतीचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकरांनी थेट युगेंद्र पवारांचं  नाव घेतलं आहे.

विधानसभेत बारामतीला एका नव्या चेहऱ्याची गरज आहे. त्यात युगेंद्र पवार हा तरुण आणि चांगला चेहरा आहे. आम्हाला बारामतीत नवीन आमदार हवा आहे , असे बारामतीकर म्हणाले,  आतापर्यंत बारामतील अजित पवारांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. आता मात्र बारामतीचा भावी आमदार कोण विचारल्यास थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतलं आहे. भावी आमदार म्हणून युगेंद्र पवारांच्या नावाला  बारामतीकरांनी पसंती दिली आहे.