कोल्हापूर , प्रतिनिधी : देशात सर्वत्र मोदीविरोधी वातावरण तयार झाले आहे आणि हे महाराष्ट्रात देखील आहे. मोदी भयभीत झाल्याने महाराष्ट्रात तीन दिवसात सात प्रचार सभा घेतल्या आहेत. याचा अर्थ काय होतो, नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे पराभव मान्य केला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चांगले काम करत असून आघाडीचे उमेदवार अधिक निवडून येतील. आरक्षण वाचवण्यासाठी, महिला विकासासाठी, महाविकास आघाडीला विजय करण्याचे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चैन्निथला येथे पत्रकार बैठकीमध्ये केले.
रमेश चैन्निथला म्हणाले , कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 वर्षानंतर शाहू छत्रपती हे निवडणूक घडवत आहेत राज्यांमध्ये तसेच कोल्हापूरमध्ये वातावरण चांगले असून शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली . ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांना 400 लोकसभेच्या जागा पाहिजेत कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलाचेआहे. ते बदलण्याची भाषा करतात. मात्र आम्ही संविधान बदलून देणार नाही.मोदींच्या विरोधात देशात वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास आहे. त्यांनी सांगितले भाजप खोटा प्रचार करत आहे. लोकांना फसवतात भारताचे विभाजन करून दक्षिण भारतात दुसरा देश बनवला जाईल असा खोटा प्रचार करत आहेत. ते स्वतःच्या विकास कामाबद्दल समस्यांशी बोलत नाहीत.
सयाजी हॉटेल येथे झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.