कोल्हापूर : सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. एका बाजूला द काश्मीर फाइल्ससारखा प्रपोगंडा चित्रपट काढून मतांचा ध्रुवीकरण केले जाते. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता, मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला. असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला. सत्यशोधक चित्रपट पाहताना आमदार सतेज पाटील हे काही वेळ भाऊक झाल्याचंही दिसुन आले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेला 'सत्यशोधक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता 'सत्यशोधक' हा चित्रपट कसा वाटला याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असल्या तरी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील 'सत्यशोधक' हा चित्रपट आज गुरुवारी शाहू चित्रपटगृहामध्ये पाहिला. दुपारी 3 ते सायंकाळी 6 असा दोन तासाचा हा संपुर्ण चित्रपट आमदार सतेज पाटील यांनी पाहिला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव आणि काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थीत होते.
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची दारे महात्मा जोतिबा फुले यांनी खुली करुन दिली. एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षण-अभ्यासातून त्यांनी कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक या चित्रपटात पाहायला मिळते. दोन तासाचा हा चित्रपट पाहताना आमदार सतेज पाटील हे देखील भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापुरातील नागरिकांसाठी दोन दिवस सत्यशोधक चित्रपट कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत दाखविण्यात येणार आहे. याची तिकिटे कॉग्रेस कमिटीच्या कार्यालयातून देण्यात येतील, असेही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. शिवाय, सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान एका बाजूला द काश्मीर फाइल्ससारखा प्रपोगंडा चित्रपट काढून मतांचा ध्रुवीकरण केल जात. अशा चित्रपटांना भाजपकडून देखील पाठबळ मिळते. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत द काश्मीर फाइल्स चित्रपट आला होता. मात्र कोल्हापूरची भूमी ही शाहू महाराजांची भूमी आहे. त्यामुळे या ठिकाणी जातीच धूर्वी करण चालत नाही. हेच यावेळी कोल्हापूरकरांनी दाखवुन दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राहुल माने, प्रताप जाधव,
गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शंकरराव पाटील, बजरंग पाटील, शामराव देसाई, हिंदुराव चौगुले, जयसिंगराव हिर्डेकर, दुर्वास बापू कदम, बाजीराव खाडे, सत्यजीत जाधव, किशोर खानविलकर, शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, दिपा मगदूम, वृषाली कदम, माधुरी लाड, शोभा कवाळे, संध्या घोटणे, भारती पोवार, चंदा बेलेकर, वैशाली महाडीक, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय पोवार आदी पदाधिकाऱ्यांनी सत्यशोधक चित्रपट एकत्रित पाहिला.
.