कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास “कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना”पुरस्कार व्ही एस आय पुणे येथे प्रदान केला. व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार,उपाध्यक्ष व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण झाले. कारखान्याच्या वतीने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,जेष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील,संचालक सचिन मगदूम,सुनिल मगदूम,शिवाजीराव पाटील,संजय नरके,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सध्या कारखान्याच्या अध्यक्ष पदाची धुरा श्रीमती सुहासिनी घाटगे तथा आईसाहेब सांभाळीत असून शाहू कारखान्याने पारितोषिक मिळवणेची परंपरा अखंडित ठेवली आहे. यावेळचे नाविन्य म्हणजे कारखान्याच्या वतीने सात कर्मचाऱ्यांनाही पदाधिकाऱ्यांसमवेत हा पुरस्कार स्वीकारण्याचा मान मिळाला आहे.यामध्ये रघुनाथ निकम, कृष्णा पाटील, दिनकर निकम, श्रीकांत गवळी, मारुती यादव, बाळू कांबळे, शहाजी पाटील यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना असा सन्मान देणारा शाहू कारखाना राज्यातील एकमेव ठरला.
छायाचित्र- पुणे येथे श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळालेला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार,उपाध्यक्ष व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या शुभहस्ते यांचे शुभहस्ते स्वीकारताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,सोबत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,जेष्ठ संचालक कर्नाटक राज्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील,इतर संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व इतर कर्मचारीही
..हा तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वादच
यावेळी प्रतिक्रिया देताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,अयोध्येत श्रीराम मंदिरमध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेप्रित्यर्थ कागलमधील विविध धार्मिक कार्यक्रमांचे नागरिकांना निमंत्रण देत असताना एका सामान्य धनगर कुटूंबाच्या दारात शाहू कारखान्यास हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी समजली.त्याचे वितरणही समारंभपुर्वक झाले.या शुभ संकेतावरून आम्हाला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाला असेच आम्ही मानतो.