अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. रविंद्र मोरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. रविंद्र मोरेजिल्हाध्यक्षपदी डॉ. रविंद्र मोरे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी भारतश्री नारायण माजगांवकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी राजू कवाळे, जिल्हा खजानिसपदी गणेश एस सकट यांची निवड करण्यात आली.

जिल्हा सदस्यपदी अॅड. सचिन आवळे, संदिप घाटगे (पत्रकार), अरविंद भानुसे, पापालाल पठाण, रणजीत पाटील, हेमंत कवाळे, सिकंदर सोनुले यांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा अॅम्येच्युअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने आगामी २०२४ हे वर्ष आरोग्यदायी वर्षे म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे नुतन जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले. मोरे म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करणार आहे. अल्प फी मध्ये त्यांना जिम उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संजय दुधाणे, प्रकाश द्राक्षे आदी उपस्थित होते.

🤙 9921334545