महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६९ वा नाट्य महोत्सवात १८ नाटकांची मोफत पर्वणी

कोल्हापूर( प्रतिनिधी )महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे विभागाच्या वतीने दिनांक ०२ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत (शनिवार व रविवार नाटकास सुट्टी) सायंकाळी ७ वाजता संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर ६९ वा प्राथमिक नाट्य महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर विभागीय प्राथमिक नाट्य महोत्सव आयोजनाचा मान यंदाही सलग तिसर्‍या वर्षी कोल्हापुरलाच मिळाला आहे.

या नाट्य महोत्सवात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील १८ नाटयप्रयोग सादर होणार आहेत. कामगारांसह इतरही कलावंतांचा एकत्रीत अविष्कार असणारी विविध विषयांची व वैविध्यपूर्ण मांडणी असणारी नाटके पाहता येतील. बहुतांशी नाटकांमधुन सामाजिक जाणीवा समृध्द करण्याचा प्रयत्न कामगार नाट्य स्पर्धा करत आलेल्या आहेत. समाजभान जागे करत ही सांस्कृतिक घौडदौड साधारणपणे ६९ वर्ष अखंडपणे सुरु आहे.

कामगार नाट्य स्पर्धेच्या या मंचावर केव्हातरी पाय ठेवुन आज नाट्य, सिने व टीव्ही सृष्टीमधील कितीतरी दिग्गज आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका मिरवत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक या नाट्य महोत्सवाचा उल्लेख सातत्याने केलेला आहे.
यावर्षी सन २३-२४ चा हा नाट्यमहोत्सव कोल्हापुरकरांना बाहेरील नाटके मोफत पाहण्याची संधी देणार आहे.या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन द
२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती जयश्री जाधव, आमदार, तसेच अध्यक्ष म्हणुन शरद भुताडीया, जेष्ठ रंगकर्मी तर विशेष अतिथी म्हणुन राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापुर, मा.सुरेश केसरकर, अध्यक्ष,राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, हे उपस्थित राहणार आहेत.

या नाट्य महोत्सवात कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापुर यांचे युगे युगे शहामृगे हे पहिले नाटक सादर होणार आहे. सदर प्राथमिक नाट्य महोत्सव हा नाट्य रसिकांसाठी मोफत असणार आहे. त्याकरीता या कार्यालयाच्या
बिंदुचौक कोल्हापुर येथील कार्यालयातुन सन्मानिका सुध्दा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

सदरचा नाट्य महोत्सव रविराज ईळवे, कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व मनोज पाटील, सहाय्यक कल्याण आयुक्त,पुणे व विजय शिंगाडे, कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापुर यांचे प्रमुख संयोजनात पार पडणार आहे. या संधीचा लाभ रसिक प्रेक्षकांनी.घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🤙 9921334545