हिवाळ्यात तापमानात घसरले की, आपण घराबाहेर जाणे टाळतो. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी बाहेर न गेल्याने सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. काही लोकं उन्हात जाणे टाळतात.पण सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. दररोज सूर्यप्रकाशात काही वेळ घालवल्याने अनेक फायदे होऊ शकतात. सूर्यप्रकाश घेतल्याने फक्त शारीरिकच नाही तर मानसिक फायदे देखील होतात.
सूर्यप्रकाशाचे फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यायची नाहीये. सकाळी फक्त तुम्हाला घराबाहेर जायचं आहे. कोवळ्या उन्हात फेरफटका मारायचा आहे. उन्हात शांतपणे बसू शकता किंवा तुमच्या बाल्कनीत बसून सकाळचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला सूर्यप्रकाशही मिळेल.
व्हिटॅमिन डी
शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी Vitamin D आवश्यक असते. व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. आपल्या शरीराला सर्वात जास्त व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळतो. त्यामुळे सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवल्याने तुमचा दैनंदिन व्हिटॅमिन डीचा डोस पूर्ण होऊ शकतो.
मानसिक आरोग्य
हिवाळ्याच्या हंगामात बरेच लोक सीझन इफेक्टिव्ह डिसऑर्डरचे शिकार होतात. सूर्यप्रकाश यापासून आराम किंवा प्रतिबंध मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पहाटे सूर्यप्रकाशात थोडा वेळ राहिल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. हे तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन सेरोटोनिन सोडते, ज्यामुळे आपला मूड सुधारतो.
ताण कमी करतो
सर्यप्रकाश आपल्या शरीरात आनंदी हार्मोन्स सोडतो, ज्यामुळे तणाव कमी होतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर ठरू शकतो.
दिवसाची चांगली सुरुवात
काळी लवकर उठले की तुमची दिवसाची सुरुवात छान होते. यामुळे फ्रेश वाटते. सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवणे ही समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला अधिक सक्रिय वाटते.
झोप चांगली लागते
काळी सूर्यप्रकाशामुळे तुमची ह्रदयाची लय सुधारू शकते, म्हणजे तुमचे झोपेचे चक्र सुधारते. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येते आणि दुसऱ्या दिवशी अधिक फ्रेश वाटते. त्यामुळे तुमचे आरोग्यही निरोगी राहते.