गारगोटी(प्रतिनिधी) राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमुहातील नागरीकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण विकास योजनेतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील 5 गावांतील विकास कामांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी भागातील नागरीकांना विविध पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या माध्यमातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील 5 गावांतील विकास कामांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या 75 लाख निधीमध्ये भुदरगड तालुक्यातील शेणगांव 15 लाख, गारगोटी 20 लाख, राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली 15 लाख, कसबा वाळवे 15 लाख, तारळे 10 लाख आदी निधी मंजूर झाला असून या गावातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मंजुरीबाबत अल्पसंख्याक विकास विभागाने दि.18 ऑक्टोंबर, 2023 रोजी शासन निर्णय काढला आहे.