दोनवडे प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील वाकरे व दोनवडे गावात दालमिया शुगरच्या वतीने ऊस तोड सूरू करण्याचा प्रयत्न झाला पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वाकरे येथील दालमियाच्या कर्यालतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यकर्त्यांनी कार्यालयास टाळे लावले. तर दोनवडे गावातील ऊस तोडी बंद केल्या.
यापुढे ऊस तोड करू नये असे निवेदन दालमिया शुगरच्या अधिकाऱ्यांना दिले. जोपर्यंत मागील हंगामातील ऊसाचे ४००रु मिळत नाहित तोपर्यंत ऊस तोड करु नये असा इशारा दिला. जर ऊस तोड झाली तर उद्रेक होईल आणि होणाऱ्या नुकसानीस कारखाना जबाबदार राहील असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान ऊस तोडीसाठी सोलापूर, बीड या जिल्ह्यातील ऊस तोड कामगार तोड बंद राहिल्याने अस्वस्थ झाले आहेत. कधी ऊस तोड होईल हे निश्चित होत नसल्याने काहींनी परतीचा मार्ग स्वीकरला आहे.