मुंबई : ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यामुळे त्याच्यासह मंत्री दादा भुसे व शंभूराजे देसाई यांचीही नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. विशेषतः या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवावा अशी आमची मागणी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले…. 1
यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे. ललित पाटिलला मी ओळखत नाही कारण नसताना माझे नाव घेतले जात आहे. सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस देणार आहे. ललित पाटील प्रकरणात माझा थोडा संबंध जरी सापडला तर मी राजकारण सोडेल, असे वक्तव्य मंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे.
शंभुराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की, ललित पाटिलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. कारण, विरोधकांनी केलेल्या आरोपांनुसार ललितला रुग्णालयात दीर्घकाळ ठेवण्याकरता आणि त्याला रुग्णालयातून फरार होण्याकरता राजकीय मंडळींनी मदत केली आहे. त्याला आजच तामिळनाडूच्या चेन्नईतून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यावर आरोप करत ललित पाटील प्रकरणात नाव घेतले यानंतर आता शंभुराज देसाईंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ललित पाटिलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
