कोल्हापूर : 2 ऑक्टोंबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, आज जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास ) हा स्वच्छता उपक्रम 1278 ठिकाणी राबविणेत आला. या उपक्रमात नागरीकांनी लाखोंच्या संख्येन सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती करवीर व ग्रामपंचायत उंचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत उंचगाव येथे स्वच्छता श्रमदान उपक्रम आयोजीत केला होता.ग्रामपंचायत कडील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी करणेसाठी, नागरीकांनी कचरा वर्गीकरण घरातच करावे. प्लास्टीक चा वापर कमी करावा. असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले.
एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास ) या स्वच्छता मोहीमेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. यावेळी स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, पंचायत समिती सदस्य सुनिल पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत कचरा मुक्ती या विषयावर तयार केलेल्या गिताचे सादरीकरण कोल्हापूर जिल्हा परिषद, कर्मचारी कला मंच यांच्या वतीने यावेळी करण्यात आले. तसेच स्वच्छतेचे महत्व या विषयावर यावेळी दोन शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या वतीन शाहीरी पथका मार्फत जनजागृतीचा उपक्रम याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता.स्वच्छता श्रमदानासाठी जमलेल्या सर्वांनी स्वच्छता शपथ घेवुन श्रमदानास सुरुवात केली. यासाठी 4 स्वच्छता पथके तयार करुन, गावातील चार प्रमुख ठिकाणी मंगेश्वर कॉलनी, मंगेश्वर मंदिर परिसर, शांतीनगर, मणेर मळा येथे स्वच्छता श्रमदान मोहीम राबविणेत आली.
या श्रमदान मोहीमेत 4 ट्रॉली, 3 घंटागाडी कचरा संकलन करण्यात आला.या श्रमदानासाठी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व)., माधुरी परीट तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तज्ञ, सल्लागार, गट विकास अधिकारी विजय यादव, विस्तार अधिकारी ग्रा.पं., गट समुह समन्वयक, करवीर पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत उंचगाव सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच वैजयंती यादव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय धनगर, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका , बचत गट महीला, शिक्षक विद्यार्थ्यी यांना या उपक्रमात सहभाग घेतला. एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास ) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते याला प्रतिसाद देत या उपक्रमात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी झाले. जिल्हयातील सर्व 1025 ग्रामपंचायतींमध्ये 1278 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
15 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवडा कार्यक्रम मध्ये गावातील पर्यटन स्थळे व सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शालेयस्तरावर विविध स्पर्धा ,सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच स्वच्छता रन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले या सर्व कार्यक्रमांमध्ये तालुकास्तरावरती खासदार,आमदार हे सहभागी झाले
.या विविध उपक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ,स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक तसेच स्वयंसेवी संस्था ,तरुण मंडळे, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .