महिला आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ; भूमिका केली स्पष्ट

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले आहे. नवीन संसद भवनात आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली. केंद्रीय कॅबीनेटमध्ये महिला आरक्षणासाठी विधेयक मंजूर करण्यात आले.दरम्यान आज हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली.

महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.नवीन संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांसाठी इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. महिला आरक्षणावर बरीच चर्चा झाली. महिला आरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

आज आपले सरकार संविधान दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळेल. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले, पण अनेक पवित्र कामांसाठी देवाने माझी निवड केली आहे.नरेंद्र मोदी म्हणाले, चांद्रयान-3 च्या यशाचा भारताला अभिमान आहे. नव्या संकल्पाने आम्ही संसद भवनात आलो आहोत. कटुता विसरून पुढे जायचे आहे. ही इमारत नवीन आहे. सर्व व्यवस्था नवीन आहेत. सर्व काही नवीन आहे, परंतु काल आणि आज जोडणारा एक मोठा वारसा आहे जो नवीन नाही, जुना आहे.

महिला आरक्षणाबाबत नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले, “महिला आरक्षणाबाबत यापूर्वीही संसदेत प्रयत्न झाले आहेत. आज आपले सरकार संविधान दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळेल. हे विधेयक कायदा झाल्यावर त्याची ताकद आणखी वाढेल.

“”मी दोन्ही सभागृहांच्या खासदारांना आवाहन करतो की तो सर्वांच्या संमतीने मंजूर करावा. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. धोरणनिर्मितीत महिलांची भूमिका असायला हवी. तसेच, पंतप्रधान मोदींनी नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल अभिनंदन केले. महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखले जाईल,” असे मोदी म्हणाले.