कोल्हापूर (प्रतिनिधी) चांगल्या आरोग्यासाठी गावात स्वच्छता असणे आवश्यक असुन, गावातील लोकांनी वैयक्तीक शौचालय व सार्वजनिक शौचालय यांच्या वापरा सोबतच, सांडपाणी व्यवस्थापन , घनकचरा व्यवस्थान, प्लास्टीक कचरा व्यवस्थान करुन गावांनी शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल करावी असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष यांनी केले.
स्वच्छता हि सेवा 2023 अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, कोल्हापूर , पंचायत समिती पन्हाळा व ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी,ता. पन्हाळा येथे स्वच्छता महाश्रमदान मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
महाश्रमदान मोहीमेची सरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वच्छता ही सेवा 2023 नाम फलकाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या व सरपंच राधा बुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वच्छता शपथ घेवून , गावातुन विद्यार्थ्या मार्फत जनजागृती फेरी काढण्यात आली. याठिकाणी शाहिरी पथकाच्या माध्यमातून स्वच्छता विषयावर गितांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी 4 स्वच्छता पथकाच्या माध्यमातून श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हापरिषद अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती पन्हाळा अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांच्यासह 423 लोकांनी या श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला.
या श्रमदान मोहिमेत एकूण 8 ट्रॉली कचरा संकलन करण्यात आले. जमा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येऊन हा कचरा अंतिम प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे.
या श्रमदानासाठी अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सुषमा देसाई, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अरुण जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी, माधुरी परीट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पावस्व,तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तज्ञ, सल्लागार व कर्मचारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा सोनाली माडकर, विस्तार अधिकारी ग्रा .प., कर्मचारी , ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजी सांगळे, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर,सर्व सदस्य ,ग्रामपंचायत कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला यांनी श्रमदानात सहभाग घेतला .
तसेच तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी, ग्रामपंचायत नृसिंहवाडी, तालुका शिरोळ व तीर्थक्षेत्र श्री बाळूमामा, ग्रामपंचायत आदमापुर, तालुका भुदरगड या ठिकाणी ही आज स्वच्छता श्रमदान मोहीम घेण्यात आली. यावेळी स्वच्छता ही सेवा 2023 नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. स्वच्छता शपथ घेण्यात आली . विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृतीची प्रभात फेरी घेण्यात आली. यासारखे विविध उपक्रम घेण्यात आले या उपक्रमाला तालुक्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला.

