प्रयाग चिखली :रेडे डोहाजवळील चार वाहनाच्या विचित्र अपघात अकरा जखमी एक ठार…


प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी (ता.करवीर) येथील रेडेडोहाजवळ एर्टीगा कार, एक रिक्षा व दोन मोटरसायकली यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारही वाहनावरील अकरा जण जखमी तर एक जण ठार झाला.
ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली
धडक जोराची असल्यामुळे चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे,
घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी भेट देऊन पाहणी केली
याबाबतची घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी
येरवडा पुणे येथून आज सकाळी जोतिबा देवदर्शनासाठी ईरटीगा कार मधून आलेले निवृत्ती गंगाधर बिडगर यांचे कुटुंबीय जोतिबा दर्शन घेऊन परत येत होते. ही गाडी येथील रेडेडोह ठिकाणी आली असता कोल्हापूरहून ज्योतिबाकडे जाणारा मुस्ताक शेख यांचा रिक्षा यांची धडक झाली दरम्यान पल्सर आणि स्प्लेंडर अशा दोन मोटरसायकली ही या अपघातात सापडल्या. यामुळे जोरदार अपघात होऊन रिक्षा नाल्यामध्ये फेकली गेली तर ईरटीगा गाडी झाडावर आदळली या गाडीखाली दोन मोटरसायकली सापडल्या. धडक जोरदार झाल्यामुळे सर्वच वाहनातील अकरा जण जखमी झाले तर एका मोटरसायकल वरील एक जण ईरटीगा गाडी खाली सापडला. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी ईरटीगा गाडीतीलजखमी बिडगर कुटुंबीयांतील सहा जणांना काचा फोडून बाहेर काढले तसेच इतर पाच जखमी ना ॲम्बुलन्सद्वारे कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान बराच वेळानंतर एक जण ईरटीगा गाडीखाली सापडल्याचे लक्षात आले यावेळी लोकांनी गाडी उचलून त्यास बाहेर काढले व उपचारासाठी कोल्हापुरात नेण्यात आले. मात्र तो मयत झाल्याचे समजते.
ईरटीगा गाडी हि माजी सैनिक सुंदर निवृत्ती बिडगर (वय 42) सध्या राहणार येरवडा, मुळगाव डिग्रज -संगमनेर जिल्हा अहमदनगर यांची असून गाडीमध्ये त्यांची पत्नी – शांता सुंदर बिडगर (वय 38) वडील – निवृत्ती गंगाधर बिडगर (वय ७२) आई – कमलाबाई निवृत्ती बिडगर (वय 68) मुलगा – गितेश सुंदर बिडगर (वय १० वर्षे) मुलगी– आरोही सुंदर बिडगर ( वय ८ वर्षे) हे सर्वजण जखमी झाले आहेत. सुंदर बिडगर हे ड्रायव्हिंग करत होते. जोतिबा दर्शन करून ते बाळूमामा आदमापूर येथे जाणार होते.
रिक्षा चालक मुस्ताक शेख हा पॅसेंजर घेऊन जोतिबाकडे जात होते. मोटर सायकल स्वार हे स्थानिक पातळीवरील असावेत असा अंदाज आहे.
धडक जोराची असल्यामुळे सर्वच गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अकरा जखमी तर एक ठार झालेला आहे ठार झालेली व्यक्ती ही मोटरसायकल वरील आहे असे समजते.

🤙 8080365706