
प्रयाग चिखली : कोल्हापूर – पन्हाळा महामार्गावरील केर्लीजवळ (येथील जगबुडी पुलाजवळ) तसेच क्षेत्र प्रयाग (चिखली ते वरणगे दरम्यान चा रस्ता) ठिकाणी पुराच्या पाण्याची पातळी रस्त्याच्या बरोबरीने झाली आहे. थोडक्यात या ठिकाणी पुराचे पाणी आणि रस्त्याची लेव्हल समांतर झाल्यामुळे पाणी आणखी थोडे वाढले तर या दोन्ही ठिकाणची सध्या चालू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ठिकाणच्या व्यतिरिक्त या रस्त्यावर कोठेही पाणी नाही. गेल्या तीन दिवसापासून या दोन्ही ठिकाणी पुराचे पाणी रस्त्याच्या खाली दोन फुटावर खाली होते मात्र पावसाची संततधार आणि राधानगरी धरणातील पाणी यामुळे आज शुक्रवारी पहाटे पुराच्या पाण्याची पातळी रस्त्याच्या अगदीच बरोबरीने झाली आहे. सध्या या दोन्ही ठिकाणची वाहतूक चालू आहे मात्र थोडे जरी पाणी वाढले तरी या ठिकाणची सध्या चालू असलेली वाहतूक प्रशासन पूर्णपणे बंद करू शकते क्षेत्र प्रयाग या ठिकाणी पुराच्या पाण्याची पातळी रस्त्यावर पडल्यामुळे पुराचे पाणी थोडे जरी वाढले तरी वरणगे प्रयाग चिखली या मार्गावरील सध्या चालू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बालिंगा पुल वाहतूक बंद झालेल्या काळात हा पर्यायी मार्ग प्रवाशांना उपयुक्त ठरला होता.
