कोल्हापुरात घराची भिंत कोसळून महिला ठार

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील किणे येथे राहत्या घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली असून दोघेजण गंभीर जखमी झालेत.

सुनिता अर्जुन गुडूळकर (वय 45) असं ठार झालेल्या महिलेचं नाव असून, पती अर्जुन गुडूळकर व नणंद वत्सला गुडूळकर या गंभीर जखमी झाल्यात. ही घटना पहाटेच्या सुमारास घडलीय. जखमीना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आजरा तालुक्यातील किणे गावात पहाटे पाच वाजण्याच्या गावात मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी गुडूळकर यांच्या घराची भिंत अचानक कोसळून मोठा आवाज आला. या आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण सापडले असल्याचं दिसून आलं. तिघानाही तातडीने मातीच्या ढिगाऱ्यातून ग्रामस्थांनी बाहेर काढलं. मात्र, सुनिता गुडुळकर यांचा मृत्यू झाला होता.

🤙 8080365706