पिक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम सन 2023 मध्ये दिनांक 25 जुलै 2023 अखेर 10 हजार 854 शेतकरी सहभागी झाले असून 3 हजार 189 हेक्टर क्षेत्रासाठी 13.50 कोटी रक्कमेचे विमा संरक्षण करण्यात आले आहे. पीक विमा योजनेमध्ये दिनांक 31जुलै 2023 पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

या योजनेमध्ये आतापर्यंत गडहिग्लज, चंदगड, करवीर व शिरोळ तालुक्यामध्ये 1 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तर उर्वरीत सर्व तालुक्यामध्ये 500 ते 700 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून जिल्ह्यातील अंदाजे 20 हजार शेतकरी सहभागी होतील, असे कृषी विभागाकडून कळविण्या आले आहे.

🤙 8080365706