छत्रपती संभाजीराजे यांनी साधला इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांशी संवाद

मुंबई : रायगडमधल्या खालापूरमधले इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. दरम्यान  छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

इर्शाळवाडीत नागरिकांना चौक या ठिकाणी कंटेनरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी सरकारकडून या ग्रामस्थांची निवाऱ्याची सोय केली आहे. तिथे संभाजीराजे यांनी भेट दिली. तेव्हा स्थानिकांना त्यांनी धीर दिला. धीर सोडू नका, आम्ही सगळे आपल्या पाठिशी आहोत, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. तिथली परिस्थिती जाणून घेतली. सर्वांची सोय सरकारने केली आहे. पण त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं, ही माझी सरकारकडे विनंती राहिल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावं आहेत. ज्यांचं पुनर्वसन हे केलं गेलं पाहिजे. अशा धोकादायक स्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांची माहिती घेऊन सरकारने या संदर्भात तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये सरकारी खाजगी संस्था आहेत. त्यांच्या मार्फत हा सर्व्हे केला गेला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

🤙 8080365706