प्रयाग चिखली येथील कुटुंबांचे स्थलांतर

कोल्हापूर : पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी आज रविवारी दिवसभर वाढतच राहिल्यामुळे शासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रविवारी रात्री उशिरापर्यंत करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील शंभरावर कुटुंबातील सुमारे चारशे वर ग्रामस्थानी आपल्या संसार साहित्यासह आणि सुमारे दिडशेवर जनावरांना सोनतळी येथे सुरक्षा स्थळी स्थलांतरित केल्याची माहिती येथील लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांनी दिली.

तर आंबेवाडी येथील सुमारे 30 कुटुंबातील शंभरावर लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती सरपंच सौ सुनंदा मारुती पाटील यांनी दिलीदरम्यान करवीर चे तहसीलदार स्वप्निल रावडे तसेच करवीर चे पोलीस अधिकारी श्री जाधव यांनी प्रयाग चिखली व आंबेवाडी गावास भेट देऊन पुराच्या स्थितीची माहिती घेत प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सर्वच ग्रामस्थांनी स्थलांतर करावे अशी दवंडी गावामध्ये देण्यात आलीप्रयाग चिखलीला जोडणाऱ्या दोन रस्त्यावर आज दिवसभरात पाणी आले नव्हते.

त्यामुळे चिखली ते पन्हाळा रस्त्याने ग्रामस्थांनी आपले संसार साहित्य तसेच जनावरे घेऊन सोनतळी येथे स्थलांतर केले. रात्री उशिरापर्यंत लोकांचे स्थलांतर चालू होतेप्रयाग चिखलीतून सोनतळी कडे जाणाऱ्या चिखली ते पन्हाळा रोड दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी उद्या सोमवार पर्यंत वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आज या रस्त्याने सोनतळी येथे स्थलांतर केले. पुराचे पाणी वाढत असल्याने सोमवारी सकाळी प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता आहेदरम्यान स्थलांतराच्या दृष्टीने ग्रामस्थ सतर्क आहेत. सोमवारी दिवसभरात प्रयाग चिखली येथील बहुतांशी लोकांचे स्थलांतर अपेक्षित असल्याचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले.

दरम्यान क्षेत्र प्रयाग येथे संगम परिसरात कुंभी कासारी भोगावती तुळशी या नद्यांचे प्रचंड पाणी संगम परिसरात एकवटले असून या ठिकाणी पाण्याचा प्रचंड डोह निर्माण झाला आहेप्रयाग येथील सर्व मंदिरे पाण्यामध्ये गेले आहेत.

🤙 8080365706