दहावीत 42 टक्के पडलेल्या व्यक्तीकडून आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार : राज ठाकरे

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाहीचा अर्थ आपल्या खास शैलीत सांगितला.यावेळी राज ठाकरे यांनी लोकशाही कशाला म्हणतात, हे आज तुम्हाला कळाले असेल. ज्या व्यक्तीला दहावीत 42 टक्के पडलेत तो आज आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करतो, असे म्हंटले. यावर एकच हशा पिकला.

तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना एक सल्लाही दिला. “आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं, तर तुम्हाला तर असलेच पाहिजे.

त्यांना वाटते बऱ्याच गोष्टी आपल्या गुजरातमध्ये आल्या पाहिजेत, तसं वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या राज्याबद्दल प्रेम असते, तुमच्या मनातही आपल्या राज्याविषयी ठासून असलं पाहिजे. तुम्ही उद्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल, पण महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

🤙 8080365706