
कोल्हापूर : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

२०२४ च्या निवडणुकीत नाके दाबल्याखेरीज आरक्षण मिळणार नाही, असा रोखठोक इशारा देत येत्या ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला.ॲड. प्रशांत देसाई अध्यक्षस्थानी होते. राजारामपुरीतील सूर्या हॉल येथे बैठक झाली. बाबा इंदूलकर म्हणाले, ”कायद्यान्वये मिळणारे आरक्षण घेऊन चाळीस वर्षांत जे घडले नाही, ते घडवूया.

ज्या गरीब मराठ्यांची ससेहोलपट होत आहे, ज्यांच्या धोतराला ठिगळं आहेत, त्यांनी नेतृत्त्व करायला पुढे यावे. तुम्ही फक्त काडी पेटवा, त्याचा वणवा देशभर पेटेल.
