
टाकळीवाडी: तालुका शिरोळ येथील मोकाट बैलांच्या झुंजी मध्ये बापू कृष्णा बिरणगे या शेतमजुराच्या घराची पडझड झाली आहे. दररोज नेहमी मातंग समाज येथे मोकाट बैलांची झुंज चालते यामध्ये या या शेतमजुराचे नुकसान झाले आहे. हे शेतमजूर नियमित दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात. दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा करण्यात आली नाही. उलट ग्रामपंचायत व यल्लमा देवी ट्रस्ट ने पडलेल्या घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. एक ही ग्रामपंचायत सदस्य किंवा ट्रस्टच्या लोकांनी पाहणी सुद्धा केली नाही.

घरी स्त्रिया, लहान बालके असतात. भीतीचे वातावरण पसरलेले असताना सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. दुसऱ्याच्या शेतामध्ये कशीबशी आपली पोटाची खळगी भरतात निदान तरी त्या मोकाट बैलांची बंदोबस्त तरी करावा अशी आता मागणी आहे.
