
मुंबई : राज्याच्या मध्यवर्ती भागात एका एअरपोर्टची गरज असून कराड शहरात एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सुरु असलेल्या अधिवेशनात केली आहे.

यावेळी त्यांनी नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील संभाजीनगरासह अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी माहीती दिली.मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी नवीमुंबईता विमानतळ वापरात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले. कराड शहरात विमानतळासाठीचा प्रस्ताव आहे.
