भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील घाट रस्ता बंद….

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे.

हा घाट अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच हवामान विभागाकडून जेव्हा जेव्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहे.

🤙 8080365706