
रायगड: जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी सारखी दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशनरी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता असून, दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत.
