शिक्षक भरतीसाठी भर पावसात आंदोलन सुरू ; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

पुणे : डीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशन यांच्या वतीने 55 000 शिक्षकांची भरती लवकरात लवकर व्हावी या व इतर विविध मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 17 जुलैपासून गेली चार दिवस भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊन चार महिने उलटून गेले असून शासन शिक्षक भरती करत नाही. तसेच वित्त विभागाने 80% जागा भरण्यासाठी परवानगी दिलेले असतानाही शासन लवकर भरती करत नाही.

गेली पाच वर्ष शासनाने शिक्षक भरती केलेली नाही. राज्यात 55000 शिक्षक पदे रिक्त आहेत कित्येक शाळा विना शिक्षक चालत आहेत. राज्यात अडीच लाख टीईटी उत्तीर्ण स्टुडंट असताना सरकार कंत्राटी पद्धतीने निवृत्त शिक्षकांना नेमत आहेत. यासाठी डीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी असोसिएशनच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी डीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येणार आणि तुम्ही .. या स्लोगन अंतर्गत 55 हजार शिक्षक भरती लवकरात लवकर करा.. तसेच पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करा, रिक्त पदांच्या 80% शिक्षक पद भरती करा, विभागीय भरती गुणवत्ता यादी लावण्याचा शासनाच्या विचाराधीन असल्यास तो निर्णय रद्द करण्यात यावा, केंद्रीय पद्धतीने गुणवत्ता यादी लावण्यात यावी, प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, सर्वच प्रवर्गांचा अनुशेष भरून काढण्यात यावा आणि ज्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त असतील त्यांच्या प्रश्न तातडीने मार्गे लावून त्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार जागा देण्यात याव्यात, तसेच सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांना जिल्हा परिषद शाळेवर कंत्राटी नेमणूक करण्यात येऊ नये या व इतर अनेक मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास यावेळी बेमुदत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष शारदा कोळतेकर, सहकारी असावरी बाबर, शफिक चौगुले, तोसीफ पटेल, वृषाली पाटील, तुषार देशमुख, सदिच्छा निमकर, रूपाली परीट, सुनिता गवळी, शिवाजी पाटील तसेच सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यता धारक उपस्थित होते.

🤙 8080365706