
कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापुर यांच्या पुढाकारातून ‘ चांगला आणि वाईट स्पर्श ‘ याबाबत विद्यार्थ्याना व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यात आले. माई साहेब बावडेकर विद्यालय ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आज हा कार्यक्रम झाला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी . अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव प्रितम पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 आणि त्यामधील तरतुदी आणि मुलींनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमिता कुलकर्णी यांनी मुलींना स्पर्श कसा ओळखावा याबद्दल मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मुलींनी आपल्या हक्का बाबत जागृत राहुन वेळीच घडणाऱ्या घटनाबाबत आपले पालक व शिक्षक यांना कल्पना दयावी ,असे आपले मत मांडले. निभर्या पथकाच्या प्रमुख मेघा पाटील यांनी प्रत्यक्षात पोक्सो कायदयाबद्दल माहिती सांगितली.यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थी ,शिक्षक सहभागी झाले होते.
