साबळेवाडीत शॉक बसून शेतक-याचा मृत्यू

कुडित्रे : शेतातील विहीरीवरील पंप चालू करताना शॉक लागुन साबळेवाडी (ता. करवीर) येथील अरूण आनंदा वरपे (वय ४०) या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला.

दोनवडे फाटयाजवळ वरपे माळ येथे अरूण वरपे यांचे घराजवळच शेत व विहीर आहे. आज नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता पिण्यासाठी विहीरीवरील मोटरपंप चालू करण्यासाठी गेले होते. पण अरुण हे घरी लवकर न आल्याने घराच्यांनी शोधाशोध सुरू केली. विहीरीजवळ वरपे हे मृतावस्थेत आढळले. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. वरपे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, विवाहीत भाऊ असा परिवार आहे.

🤙 8080365706