
मुंबई : प्रसिद्ध मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचं निधन झालं आहे. आशिष साखरकर यांनी जागतिक पातळीवर अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत.

मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर महाराष्ट्र किताब त्यांनी जिंकला. एका आजारपणामुळे आशिष साखरकर यांचं निधन झालंआशिष साखरकर हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मोठं आणि आदरणीय नाव होतं. आशिष साखरकर याने मायदेशात आणि परदेशात अनेक किताब जिंकले आहेत. महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिर्व्हस असे किताब आशिष साखरकर यांच्या नावावर आहेत.
