
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचे नवीन अध्यक्ष जाहीर केले असून त्यामध्ये तरुण नेतृत्वाला मोठी संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव, कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल देसाई व हातकनगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांनी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वास धन्यवाद देतानाच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला आहे.कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे यांच्या जागी सरचिटणीस विजय जाधव यांची निवड झाली आहे. १९९८ पासून भाजपामध्ये काम करत असताना युवा मोर्चामध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.
