
राधानगरी : गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात आणि दाजीपुरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट इतकी होती. ती आज ३६० फुटापर्यंत पोहोचली आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ तासांत ६७ तर तुळशीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
