शिंदे – फडणवीस सरकारचे साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यात सहकारी कारखान्यांवर राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्यातच आत शिंदे आणि फडणवीस सरकारने साखर कारखान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती आणि निकषही निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी काळात साखर कारखान्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्ह आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.