कोकणचा हापूस अमेरिकेत….

नाशिक : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे.

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस ,केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन आंबे 20 हजार पेटीतून 75 टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ येथील हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्ष आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याच्या निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.

🤙 8080365706