कागलला परमनंट विकास कामाची गरज: समरजीतसिंह घाटगे

हणबरवाडी येथे शाळा वर्ग खोली बांधकाम शुभारंभ करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व इतर

हणबरवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ

सेनापती कापशी: कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदार नसतानाही कोटींचा निधी खेचून आणला.तेव्हा आता कागलला परमनंट आमदाराची नाही तर परमनंट विकास कामाची गरज आहे.असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

हणबरवाडी ता.कागल येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळा वर्ग खोली बांधकाम व जनसुविधा योजनेअंतर्गत विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी समरजीतसिंह घाटगे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राजे बँकेने युवकांना कर्जपुरवठा केल्यामुळे 1000 युवकांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले.येथून पुढे प्रत्येक शाळेला ई-लर्निंग सुविधा देण्याचा मानस आहे.अशा विविध विकास कामाच्या माध्यमातून छ.शाहू महाराजांच्या जन्म भूमीला कर्म भूमी करण्याचे अभिवचन घाटगे यांनी दिले.

यावेळी सांगली महानगरपालिकाच्या समाज कल्याण विभागच्या सभापती सौ.गीतांजली ढोपे-पाटील,प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.’

स्वागत दत्तात्रय कसलकर व प्रास्ताविक शिवाजी डाफळे यांनी केले.यावेळी शाहू साखरचे व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे,प्रताप पाटील,महादेव ढोपे-पाटील,सरपंच सौ.सोनाली कसलकर,उपसरपंच सौ.कविता चव्हाण, माजी उपसरपंच प्रभाकर मोहिते, लक्ष्मण नाईक (बेरडवाडी), सुधीर चव्हाण,मारुती नाईक, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग नाईक, निलेश सुतार, कॉन्ट्रॅक्टर समरजीत खराडे आदी उपस्थित होते. आभार संदीप साळवी यांनी मानले.

🤙 8080365706