आमदार नसतानाही ५४ कोटीचा निधी खेचून आणला; समरजीतसिंह घाटगे

अर्जुनवाडा येथे विकास कामांचा शुभारंभ

सेनापती कापशी: आपले सरकार आल्यानंतर केवळ सहा – सात महिन्याच्या कालावधीमध्ये कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदारा नसतानाही ५४ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

अर्जुनवाडा ता.कागल येथे विविध विकासकामांचा शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते. यावेळी समरजीत सिंह घाटगे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत.यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राजे बँकेने कर्जपुरवठा करून गेल्या दोन वर्षांमध्ये असंख्य युवा उद्योजक तयार झाले.अशा उद्योजकांचा कागलला मेळावा आयोजित केला होता.येत्या वर्षभरामध्ये जवळपास दीड हजार हून अधिक उद्योजक तयार होतील. अशा पद्धतीचे आपले नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.मतदार संघातील प्रत्येक गावासाठी निधी दिला जाईल, तुम्ही निश्चित रहा, असे आवाहनही त्यांनी केले.’

अध्यक्षपदावरून बोलताना अमरसिंह घोरपडे म्हणाले, ‘आमचे नेते समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघांमध्ये वाटचाल सुरू आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. आमदार नसताना ते इतका निधी आणू शकतात तर आमदार झाल्यावर या तालुक्याचा चेहरा मोरा बदलतील यात शंका नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांना आपण सर्वांनी साथ देण्याची गरज आहे.यावेळी सरपंच सौ. सुरेखा लुगडे,संतोष गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.’

स्वागत व प्रास्ताविक बळीराम पाटील यांनी केले.शाहूचे संचालक सुनील मगदूम,संजय चौगुले, प्रताप पाटील,शहाजी लुगडे,सौ.कल्पना रघुनाथ लुगडे, सौ.संध्या पाटील,भीमराव ढोले, विश्वास पाटील, गणेश कुंभार,वसंत करवीरकर, आनंदा दाडमोडे,भैरू ढोले,एम. के. कुंभार, अजित सातवेकर,कर्नल शिवाजीराव बाबर, प्रकाश पाटील,संजय बरकाळे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706