
आयुर्वेदात दही खाण्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. लोक जेवणात वाटीभर दही खातात तर काहीजण ताकाचं सेवन करतातकाहीजण दह्यामध्ये साखर, कापलेली फळं टाकून खातात. पण आयुर्वेदात दही खाण्याचे काही नियम सांगितले आहेत.
अनेकजण दह्यासोबत फळांचे सेवन करतात. दह्यासोबत फळांचे सेवन केल्याने पोट आणि आतड्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. दीर्घकालीन वापरामुळे चयापचय समस्या आणि एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.दह्यासोबत चिकन, मटण किंवा मासे यांसारखे मांसाचे सेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. चिकन, मटण किंवा मासे अशा अनेक पदार्थांमध्ये दही वापरले जाते हे आपण अनेकदा पाहिले असेल. या मिश्रणाने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.दही कधीही गरम करू नये. दही गरम झाल्यावर त्याचे गुणधर्म कमी होतात. याशिवाय लठ्ठपणा, कफ, रक्तस्रावाचे विकार आणि सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी दही खाणे टाळावे.
