
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यामध्ये 1. 20 टक्के मागासवर्गीय अंतर्गत मधुमक्षिका पालनाचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेल्या मागासवर्गीय महिला व पुरुषांना आर्थिक उन्नती साठी मधुमक्षिका पालनाच्या पेट्या पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल,व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मागासवर्गीय वस्तीमधील वाचनालयासाठी कपाट, टेबल, खुर्च्या , एमपीएससी यूपीएससी साठी उपयोगी पुस्तके त्याचबरोबर राज्यघटना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज,इत्यादी यांच्यावरील समग्र ग्रंथ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिखित केलेली पुस्तके वाचनालयास पुरवण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
