
कागल : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त कारखाना प्रधान कार्यालयासमोरील प्रांगणातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
दरम्यान कसबा बावडा मधील कागलवाडी येथील स्व राजेसाहेब यांच्या समाधी स्थळाचे दर्शन राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतले. दिवसभरात स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. कारखाना कार्य स्थळावरील या कौटुंबिक सोहळ्यास कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,सर्व संचालक ,संचालिका रेखा पाटील सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,व शाहू ग्रूपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद,कर्मचारी उपस्थित होते.
