
झाशी : उमेश पाल हत्याकांडातील फरार गँगस्टर अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने एन्काऊंटर मध्ये ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
झाशी येथे त्यांची चकमक झाली. यादरम्यान त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफने दावा केला आहे.या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
