
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची भीती पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. यापूर्वी आलेल्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता लोकांना वाटू लागली आहे.
कारण त्यावेळी रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि ऑक्सिजन आणि औषधांसाठी भीषण संघर्ष झाला होता आणि लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता पुढील 10 दिवसांत कोरोनाचा कहर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या केसेस वेगाने वाढतील. पण, यातही एक दिलासादायक बाब म्हणजे, 10 दिवसांनंतर कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट होताना दिसू शकते. दरम्यान गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसा, हा संसर्ग अनेक महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असला तरी, सध्या संसर्ग स्थानिक पातळीवर आहे, जो एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित आहे. महामारीबद्दल बोललो, तर संसर्ग मोठे क्षेत्र व्यापेल किंवा त्यामुळे जगातही कहर माजू शकतो.
