
बहिरेश्वर /मौजे म्हारुळ (ता करवीर )येथे नुतन सरपंचपदी काॅंग्रेस गटाच्या श्रीमती शालाबाई गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुक अधिकारी म्हणुन बीड मंडल अधिकारी प्रविण माने यांनी काम पाहिले.
म्हारूळ ग्रामपंचातची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी बिनविरोध झाली आहे तर सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.गावात काॅंग्रेस,शिवसेना,भाजपा असे गट असताना सुद्धा गटतट न मानता गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.मावळत्या सरपंच रूपाली चौगले यांनी ठरलेप्रमाणे पदाचा राजीनामा दिला रिक्त जागी शालाबाई गुरव यांचा एकच अर्ज दाखल झालेने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड झालेनंतर मावळत्या सरपंच सौ चौगले यांनी नुतन सरपंच यांचा फेटा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. नूतन सरपंच श्रीमती गुरव यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रामसेवक मेंगाणे यांनी केले.याप्रसंगी उपसरपंच सरदार पाटील,सर्व सदस्य,सदस्या, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील,शंकर मगदुम,सिंग्राप्पा पाटील, बाजीराव पाटील, राजाराम पाटील, पंडित मडके,अमृत मडके,भैरु पाटील,निवास पाटील,दिपक पाटील,अमर पाटील,मोहन पाटील, युवराज गूरव, बाजीराव कवडीक,एस एन पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….
